Tuesday, 18 December 2018

सजदा तेरा सजदा ....... दिन रैन करू ...."मनोबल"

Sajda….tera sajda (I’ll worship you) Din rain karoon (Day and night) 
Na hi chain karoon (I’ll never rest)

सजदा तेरा सजदा, दिन रैन करू, ना ही चैन करू सजदा तेरा सजदा

आज म्हणजे ०२ दिसम्बर २०१८ तब्बल ८ वर्षांपूवी आलेल्या माय नेंम इज खान मधील सजदा तेरा सजदा, या गाण्याचा खरा खुरा अर्थ समजण्यास सुरुवात झाली ती म्हणजे यजुर्वेंद्र यांच्या ध्येयाने वेड्या झालेल्या आणि सतत कार्यमग्न असणारया मनोबल या प्रकल्पामुळे. मनोबल च्या स्थापनेआधी १२ वी उत्तीर्ण व १८ वर्षावरील अनाथ विद्यार्थांसाठी संजिवन च्या माध्यमातून मुला- मुलींसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य केंद्र उभारले, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेत गरीब, दुष्काळग्रस्त, विद्यार्थांसाठी गुरुकुल च्या माध्यमातून मुला-मुलींसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले. संजिवन व गुरुकुल या प्रकल्पात तब्बल १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी लाभ घेत आहेत.  
      
मी माझे माथे झुकवणार तुझी पूजा करणार, रात्र आणि दिवस नतमस्तक होणार, कधीही ना थकता, अविश्रांत मी तुझ्या आराधनेत डुंबून राहणार, याच तत्वावर यजुर्वेंद्र व टीम मनोबल, गुरुकुल व संजिवन सतत कार्यरत आहे. येत्या २७ मार्च २०१९ ला दीपस्तंभला तब्बल १४ पूर्ण होणार आहेत या संपूर्ण प्रवासात आजपावेतो १००० पेक्षा जास्त मुलांचे सुवर्ण भवितव्य बनवण्यात, आकार देण्यात आणि आयुष्य घडवण्यात दीपस्तंभ कायम दिमाखात उभा होता आणी आज हि उभा आहे. याच कार्यात सतत खोलवर चिंतन करीत असतांना आणि महाराष्ट्रभर होत असणाऱ्या व्याख्यानमाला मधून यजुर्वेंद्र सरांना एक मोठा प्रश्न समोर आला त्याने तो अस्वस्थ झाला, झोप उडाली, भूक लागेना, कश्यातच मन लागेना......

काय घडलेलं होत हे फक्त यजुर्वेंद्र ला माहित होत... ज्ञात होत.. पण व्यक्त होता येत नव्हत... कुठली तरी घुसमट होत होती... सर आम्ही नाही का हो आमचे प्रशासकीय सेवेतील करियर करू शकत? या एका दिव्यांग मुलाने विचारलेल्या प्रश्नाने  आणि मग एका आगळ्या वेगळया जगा निराळ्या भारतातील एकमेव अश्या भव्य भावनेने उत्कट, प्रखर विचाराने भरलेला त्या विद्यार्थांना उभारी देणारा, मनाला बल प्राप्त करून देणारा तुमचा आमचा मनोबल तयार झाला.  त्या अश्या विद्यार्थांनी सुद्धा करियर करावे आणि यातच उत्तर सापडले ते एका व्याख्यानमालेत विचारलेल्या प्रश्नाचे..... सारी अस्वथता संपली..... आता यजुर्वेंद्र आपल्या २०० दिव्यांग मुलांसोबत पोटभर जेवतो, प्रत्येक सण उत्साहात साजरे करतो, होळी पासून दिवाळी पर्यंत सार काही एकाच छताखाली अर्थात मनोबलमध्ये; मात्र आजही दिन रैन करू, ना ही चैन करू सजदा तेरा सजदा याचा ध्यास लागलेला आहेच.

प्रकाश-पुजन नावाचा एक आगळा वेगळा सण फक्त मनोबल मध्ये साजरा होतो, प्रत्येक अंध मुला-मुलींचे पूजन अर्थात प्रकाश-पूजन! काय क्रांतिकारी व अफलातून विचार आहे, यावर तो म्हणतो त्यांचे बाह्य जगातील डोळे नसतील पण आतील चक्षु जागृत आहेत ते खरे भगवान बुद्धा च्या म्हणण्या नुसार अत्त दीप भवची अनुभूती घेत असतात. ते स्वत: दिपक आहेत त्यामुळे दीपावलीच्या शुभ पर्वावर यांची पूजा करणे मला गरजेचे वाटते. 

एका तळ्यात होते बदके पिले सुरेख..... या गाण्यात एका पिलाला राजहंस म्हटले आहे. मनोबल मध्ये येणारा प्रत्येक मुलगा/ मुलगी आपणहून एक राजहंस आहेत. यांच्यातील उडण्याच्या इच्छेला/इराद्याला बल देण्याचे काम दीपस्तंभ चे मनोबलकरते. जगातील जितके हि उत्तुंग कार्य आहेत त्याला जरा जास्तच वेळे लागलेला आहे कारण ते एका दोघांचे स्वप्न नसून अखील विश्वाचे कल्याणकारी, समृद्धी आणणारे आहे. अर्थात या वैश्विक प्रकल्पाला हातभार सुद्धा लाखोंचे लागले आहेत, आज मनोबलस्थापन होऊन ४ वर्षे झाली आहेत साधारण ४२ दिव्यांग त्यांच्या यशस्वी आयुष्यात दिमाखाने, अभिमानाने जगत आहेत.... अजून बरच काम बाकी आहे.
  
आस्ते कदम, आस्ते कदम हा यजुर्वेंद्र चा अत्यंत आवडता कार्य मंत्र तसेच लगे रहो और एक ही लक्ष पर डटे रहो हे सुद्धा तो नेहमी सांगत असतो. श्रद्धेय स्वामी विवेकानंद, श्रद्धेय कर्मवीर भाऊराव पाटील व श्रद्धेय बाबा आमटे यांच्या विचारसरणीवर यजुर्वेंद्र उभा आहे आणि आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे असे तो त्याच्या प्रत्येक व्याख्यानात आवर्जून सांगतो.मला नाही माहित माझ्या विद्यार्थ्याला त्याची पोस्ट मिळेल का पण तो एक सुसंकृत माणूस बनेल याकडे माझे कायम लक्ष असते आणि असेल 
        
तब्बल १४ इमारती मध्ये हा सगळा पसारा आहे, फार कठीण आहे याला एका कवेत घ्यायला पण त्याच्या एका हाकेला सगळा स्टाफ, २०० मुले सुवास्य वदनाने तयार असतात. या साऱ्याला कारण फक्त एकच प्रामाणिकतेचे अनुष्ठानअसे यजुर्वेंद्र न विसरता सांगतात. साधारण ६०,००० रुपये एका वर्षाला एका विद्यार्थ्याला निवास-भोजन-प्रशिक्षण यासाठी लागतात. त्याशिवाय इतर प्रशासकीय खर्च असा महाकाय तब्बल २ कोटी रुपये वार्षिक खर्च येतो. 

लवकरच स्वत:च्या भव्य अश्या मनोबलच्या प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये लागणार आहेत यात वडील या नात्याने आणि उदार अंत:कर्णाने मोठी अशी जागा कुसुंबा येथे मा. आदरणीय श्रद्धेय, श्री. रतनलाल बाफनाजी यांनी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी रात्रंदिवस एकच ध्यास घेऊन काम प्रगती पथावर आहे ज्यात भारतातून कोणताही दिव्यांग "मनोबल" येऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकतो 

आज मनोबल पुणे येथे ५८ विद्यार्थी खास UPSC साठी तयारी करत आहेत चला आपण हि एक दिवस, एक क्षण अनुभवू या.. आपण दिलेल्या देणगीवर, आशीर्वादावर आणि मदतीवर कदाचित आपणही यजुर्वेंद्र च्या सजदा तेरा सजदा...दिन रैन करू, ना ही चैन करू....  चा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग होऊ शकतो.....

 © भगीरथ काउन्सीलिंग सेंटर, जळगाव
पंकज व्यवहारे ७०५७२०२४९८     


मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...