Monday 27 April 2020

Spatial Ability चित्रकलाविषयक, डिझाईन मधील करियर



Spatial Ability (भौमितिक क्षमता किंवा अवकाश बोध क्षमता)

भौमितिक क्षमता ही त्रिमितीय प्रतिमा आणि आकार समजून घेण्याची क्षमता आहे. हे मेंदूच्या उजव्या बाजूचे प्राथमिक कार्य आहे आणि कोडी सोडवताना, नकाशे शोधून काढताना आणि कोणत्याही प्रकारच्या बांधकाम किंवा अभियांत्रिकी प्रकल्पात भाग घेताना याचा वापर केला जातो.

भौमितिक क्षमता किंवा अवकाश बोध क्षमता मध्ये ऑब्जेक्ट्स किंवा स्पेसमधील स्थानिक संबंध समजून घेणे, तर्क करणे आणि लक्षात ठेवण्याची क्षमता यांचा संयुक्तिक वापर असतो. भौमितिक क्षमेतेचे चार प्रकार आहेत ज्यात अवकाशासंबंधी किंवा व्हिजुओस्पॅटियल बोध, अवकाशीय दृश्य, मेन्टल फोल्डिंग आणि मेंटल रोटेशन यांचा समावेश आहे.

ही क्षमता भौमितीय रेखांकन, मसुदा तयार करणे आणि व्यावसायिक प्रशिक्षण आणि कला आणि डिझाइनमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींमध्ये उच्च असल्याचे आढळते त्यामुळे ज्यांना कला आणि डिझाइनमध्ये करियर करायचे असल्यास त्या सगळ्या विद्यार्थांना गणितीय क्षमता (Numerical Ability) आणि Figural Orientation सोबत भौमितिक क्षमता उच्च प्रमाणात लागते.

चित्रकलाविषयक, डिझाईन मधील करियर करण्यासाठी आता काही नवीन कोर्सेस आली आहेत  
जसे 
SNDT Pune, Bachelor of Vocation in Fashion Design, Bachelor of Vocation in Interior Design
B.Des UCEED (Undergraduate Common Entrance Examination for Design)
B.Des : Nasik, Sandeep University, Symbiosis Institute of Designing
B.A. Photography

Spatial Ability (भौमितिक क्षमता किंवा अवकाश बोध क्षमता) खालील करियरसाठी अत्यावश्यक आहे    
  1. ·       Architecure
  2. ·         Interior Designer
  3. ·         Landscape Architect.
  4. ·         Graphic Designer.
  5. ·         Photographers.
  6. ·         3D game design
  7. ·         Astronomers.
  8. ·         CNC Programmers.
  9. ·         Advertising –Creative Functions.
  10. ·         Fashion Designer



Numerical Ability (संख्यात्मक आणि गणितीय क्षमता)




Numerical Ability (संख्यात्मक आणि गणितीय क्षमता)

दैनंदिन आयुष्यातील कमीतकमी आकडेमोड करण्यासाठी या संख्यात्मक आणि गणितीय क्षमतेचा वापर होत असतो. आजकाल कुठल्याही प्रवेश परीक्षेसाठी न्यूमेरीकल क्षमता ही लागतेच लागते, बऱ्याच परीक्षेत या क्षमतेचा पेपर हा क्वालिफाय म्हणून गणला जातो अर्थात या पेपर मध्ये जर आपण पास असल्यास पुढील पेपर तपासले जातील, म्हणूनच या क्षमतेला अनन्यसाधारण असे महत्व आहे.

विज्ञान, अभियांत्रिकी आणि आर्किटेक्चर या तांत्रिक व्यवसायांमध्ये काम करण्यासाठी संख्यात्मक क्षमता महत्वाची आहे. व्यवसाय आणि वित्त क्षेत्रातील बर्‍याच करियर साठी देखील हि क्षमता महत्त्वपूर्ण आहे. हि क्षमता केवळ विज्ञान या क्षेत्रापुरते मर्यादित नसून लेखा काम (अकौंट) करण्यासाठी सुध्दा खूप आवश्यक आहे.

न्यूमेरिकल क्षमता मध्ये जलद आणि अचूकपणे आकडेमोड करता येणे अपेक्षित आहे. तांत्रिक विषयांमध्ये यशस्वी होणारया व्यक्तींमध्ये ही क्षमता सामान्यत: उच्चप्रमाणात आढळते अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, डेटा प्रोसेसिंग जॉब इत्यादींचा यात प्रामुख्याने करियर दृष्टीने विचार केला जातो

जर आपणास संख्या-आकडेमोड आवडत असेल आणि वेग आणि अचूकतेसह जटिल गणितातील समस्या सोडविण्याची क्षमता असेल तर खालील करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत:

  1. Actuarial Officer
  2. SSC CGL (UPSC)
  3. Data Science
  4. Data analytics
  5. Data Mining  
  6. Investment Bankers
  7. Chartered Accountants
  8. IIT/IISER
  9. Engineering, Scientist
  10. Computer Programmer
  11. Business Analyst
  12. MBA Finance
  13. Career in Statistics
  14. Career in Economics
  15. Branding
  16. Research Analyst
  17. Sales forecasting
  18. All Competitive Examinations
  19. Robotics Engineering  



1.  


Sunday 26 April 2020

भाषिक क्षमता अर्थात व्हर्बल एबीलिटी



खरंच करियर टेस्ट करावी का? काय असतं त्यात एवढं? बऱ्याच प्रकारे आज-काल करियर टेस्ट बद्दल उपाय उपलब्ध आहेत, त्यापैकी जो शास्त्रशुद्ध आहे तोच उपाय भगीरथ कौन्सलिंग सेंटर जळगाव हे घेतात. यात आपण प्रामुख्याने खालील गोष्टी चेक करतो
  1. आठ क्षमता
  2. साधारण बारा प्रकारचे कल
  3. टॉप चॉईस, गुड चॉईस या प्रकारचे करियर आणि त्याबद्दलची माहिती शिवाय
  4. आपलं व्यक्तिमत्व त्याची टेस्ट त्याचे विविध कंगोरे त्याशिवाय
  5. आपली शिकण्याची क्षमता ती कुठल्या पद्धतीची आहे तसेच
  6. कुठल्या गोष्टीमुळे आपण मोटिवेट होतो



·         सारा गोषवारा आपल्याला  एक ते दीड तासाच्या मराठी, हिंदी किंवा इंग्रजी माध्यमाच्या ऑनलाइन करिअर टेस्टमध्ये मिळतो तोही तब्बल 22 ते 25 पानी रिपोर्ट मधून.
करियर विषयी जरा विचार करून बरीचशी करियर आपल्यासमोर आहेत मग यातील नक्की कुठलं कराव कारण क्षमतांच्या आधारे आपल्या आवडी निवडी वर तसेच भविष्यातील गरजेकडे थोडंसं लक्ष दिल्यास आपल्याला योग्य असे करियर निवडता येते.

ठराविक क्षमता त्यावर आधारित काही ठराविक करिअर आहेत त्यामुळे या क्षमता जाणून घेणे गरजेचे ठरते. आज आपण अश्या एका क्षमते बद्दल जाणून घेणार आहोत जी सर्वव्यापी आहे आपल्या आयुष्यात आपण सगळ्यात जास्त हि क्षमता वापरतो ती म्हणजे भाषिक क्षमता अर्थात व्हर्बल अबिलीटी आणि व्हर्बल रीजनिंगभाषिक क्षमता काही ठिकाणी कम्युनिकेशन किंवा चर्चा विषय मांडणे भाषांतर करणे साहित्य, कंटेंट रायटिंग या करियरसाठी अत्यंत उपयुक्त असते. 

त्याव्यतिरिक्त विशेष आणि हटके करिअर जसे अनलिटिकल थिंकींग यात (लॉयर)वकील डॉक्टर शिक्षक ट्रेनर आणि काउंसलर समावेश होतो टेक्निकल जॉब मध्ये इंजिनीयर कॉम्प्युटर प्रोग्रामर लँडस्केप आर्टिस्ट इंटिरियर डिझायनर चा समावेश होतो तसेच व्यवसाय क्षेत्रात मॅनेजमेंट सेल्स ॲडव्हर्टायझिंग आणि ब्रँडिंग यांचा समावेश होतो वेबसाईट रायटिंग कंटेंट राइटिंग कॉपी रायटिंग या क्षेत्रात व्हर्बल अबिलीटी/रीजनिंग ची गरज असते.

दहावीनंतर कलाक्षेत्रात ह्युमानिटी सायन्स अंतर्गत मानसशास्त्र ,तत्त्वज्ञान सारख्या लेखी विषयांसाठी व्हर्बल अबिलीटी उपयुक्त ठरते, सध्याचे इमर्जिंग करियर मिडीया आणि जर्नलिझम क्षेत्रात लिहिण्याला पर्याय नाही म्हणून उत्तम लिहिणे सुयोग्य विचार योग्यवेळी प्रकटीकरण करणे याची मास मीडिया या क्षेत्रात गरज असते. एकंदरीत सगळ्याच क्षेत्रात ही अबिलिटी लागते.

अक्षर खराब असल्यास ते दुरुस्त करता येते त्यावर मेहनत घ्यावी लागते. उत्तम लिहायला सोबत उत्तम वाचनाची आवड असणे गरजेचे आहे त्यासोबत उत्तम ऐकता आले पाहिजे प्रशासकीय सेवेत या क्षमतेवर बरीच कामे अवलंबून असतात अगदी लेटर ड्राफ्टिंग पासून मेमो देण्यापर्यंत सारं काही लिखाणातून चालते, त्यामुळे या क्षमतेला अनन्यसाधारण असे महत्व लाभले आहे. काही करियर जी केवळ या क्षमतेवर अवलंबून आहे.
  • न्यायाधीश (जज, वकिली क्षेत्र)
  • सोशल वर्कर
  • CSR ऑफिसर
  • प्राध्यापक, शिक्षक  
  • ट्रेनर
  • एच आर ऑफिसर 
  • क्रिएटीव्ह रायटर, कॉपी रायटर
  • गाईड,
  • PR ऑफिसर
  • मिडिया Manager
  • संपादक, रिपोर्टर, न्यूज रीडर,
  • ट्रान्सलेटर        


मग आपल्याकडे आहे का ती क्षमता ते चेक करून घेणे गरजेचे आहे की नाही? आजच संपर्क करा आपल्या online करियर टेस्ट साठी
भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर जळगाव
७३८५१०२४९८, ७०५७२०२४९८



मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...