Tuesday 16 October 2018

वाचन प्रेरणा दिन २०१८

उद्या वाचन प्रेरणा दिन अर्थात १५ ऑक्टोबर 

(आपले लाडके राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस) 

काल सहज काही पुस्तके व त्यावरिल विशेष चर्चा झाली पुस्तकांबद्दल लिहायला फारच आवडते पण वाचन करायला त्याहूनही जास्त आवडते उद्याच्या पर्वावर विशेष ५ पुस्तके समोर ठेवत आहे.

पुत्री निवेदिता: सुधीर बर्वे
जन्मत: अंशिक कर्णबधिर ते व्हेटर्नरी डॉक्टर शासकीय राजपत्रित अधिकारी या प्रवासामागील एका कुटुंबाच्या प्रयत्नाची आणि जिद्दीची गोष्ट. समाजातील सर्व पालकांना विशेषत: दिव्यांग मूल असनाऱ्या पालकांना हे पुस्तक दिशा दर्शक असेच आहे. अत्यंत सुलभ अश्या ओघवत्या शब्दात मनातल्या भावनेने लिहिलेले असे पुस्तक आहे
किंमत: रु १५०
प्रकाशन: दिपस्तंभ प्रकाशन जळगाव

फिटे अंधाराचे जाळे:कृष्ण गोपाल तिवारी
देशातील पहिले प्रज्ञाचक्षू आयएएस ऑफिसर, कृष्ण गोपाल तिवारी यांची थक्क करणारी यशोगाथा
प्रत्येक स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याने वाचावे असे आत्मचरित्र
किंमत: रु १५०
प्रकाशन: दिपस्तंभ प्रकाशन जळगाव

डेल्टा १५: निला सत्यनारायण
सर्वसामान्य माणसातील असामान्य माणुसकी, दातृत्व आणि दुसर्याच्या व्यथा,वेदना, समस्या समजून घेण्याची वृत्ती यांचे संवेदनशीलपणे चित्रण करणाऱ्या ललित लेखांचा संग्रह. पुणे सकाळच्या “कवडसे” या स्तंभासाठी जे ५३ गोष्टीरुपातून लेखन केले त्याचेच मूर्त रूप म्हणजे डेल्टा १५.
किंमत: रु १६५
प्रकाशन: सकाळ प्रकाशन

दोन खिडक्या: राजीव तांबे
पालकत्वावरचे एक सुंदर पुस्तक म्हणजे दोन खिडक्या
आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी अपग्रेड झालेलो आहोत का? आपण सुजाण पालक आहोत का पहिली खिडकी ज्यातून पालक पाहतो दुसरी खिडकी ज्यातून पाल्य पाहतो, या खिडक्या मध्ये जास्त अंतर नसावे एकदा जरू वाचावे असे पालकत्वा वरचे पुस्तक
किंमत: रु १००
प्रकाशन: राजहंस प्रकाशन

अधिकारिणी: स्वप्ना जरग
करियर म्हणून प्रशासकीय मार्ग निवडून त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवांचा एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त लेखाजोखा म्हणजे अधिकारिणी यात आपण रूबरू होऊ शकतो १६ आयएएस ऑफिसर, ४ आयपीएस ऑफिसर, १ आयआरएस ऑफिसर, २ आयएफएस ऑफिसर १ दिल्ली व अंदमान निकोबार प्रशासन. प्रत्येक होऊ घातलेल्या व होणारया प्रशासकीय अधिकाऱ्याने निश्चित वाचावे असे पुस्तक

किंमत: रु ३१०
प्रकाशन: सिनर्जी स्टडी पोइंट

प्रामाणिक इच्छा हीच कि एक तरी पुस्तक उद्या (पुस्तक खरेदी करून) वाचावे, दुसऱ्याला भेट दयावी, किंवा संग्रही ठेवावी

पुस्तकांचा बुकोपेडिया हा आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या संस्थेमध्ये करण्यासाठी संपर्क करावा:

भगिरथ कौन्सलिंग सेंटर जळगाव
दुसरा मजला, लीलावती कॉम्प्लेक्स
डॉ गिरीश सहत्रबुद्धे यांच्या समोर
प्रताप नगर जळगाव
पंकज व्यवहारे : ७०५७२०२४९८

1 comment:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...