मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे
रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, त्याला ही नोकरी करून तब्बल पंधरा वर्षे झालेली होती. स्वभावाने थोडा कमी चटपटीत, पण कायम खटपट करणारा, आणि मुक्त विद्यापीठातून वाणिज्य ची पदवी घेतलेला ३५शीतला तरुण, आपला सुद्धा एक व्यवसाय असावा असे नेहमी म्हणणारा, पण परत नोकरीच करणारा असा रवींद्र, भेटला तो एका लग्नाच्या कार्यक्रमात.
मला म्हणाला खूप इच्छा आहे छोटा व्यवसाय करायची, पण पैसा अभावी करता येत नाही. त्याला विचारलं कुठला व्यवसाय करायची इच्छा आहे, तर म्हणाला तेच तर समजत नाही. असं वाटतं आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहोत, एक ना धड भाराभर चिंध्या असं होऊ नये, शिवाय आता फॅमिली ची जबाबदारी आहे, पटापट निर्णय घेता येत नाही, सांभाळूनच वागावे लागेल.
रवींद्र चे सोशल कॉन्टॅक्ट उत्तम, दुसऱ्यांना मदत करायची कायम इच्छा, मात्र निर्णय क्षमतेमध्ये तो कमी होता, जीची व्यावसायिकाला सगळ्यात जास्त गरज, लागते. एक दोन वेळा व्यवसाय करायचाप्रयत्न करून पाहिला पण तो फसला. आता परत हिम्मत करत नाही.
मग त्याला म्हटलं आपण याच्यावर बोलूया, आपल्या सगळ्या स्ट्रेंथ त्याची लिस्ट करूया, आणि त्याचा वापर सहजतेने कुठे करता येईल याचा विचार करू या. ठरल्याप्रमाणे आम्ही तशी लिस्ट केली, मग समजलं की आम्ही विविध सेवा सहज देऊ शकतो.
आज रवींद्र कडे इन्शुरन्स, म्युचल फंड, शेअर्स, अकाउंट ओपनिंग आणि सोबतीला टॅक्सेशन चे काम सुरू आहेत. रवींद्र फार अघळपघळ नाही, मुद्देसूद बोलणे, प्रश्न सोडवणे, फार काळ रेंगाळत बसायला त्याला आवडत नाही, केवळ एका काउंसलिंग मधून, चर्चेच्या माध्यमातून रवींद्रचा एक प्रश्न नीकाली लागला होता.
आता गरज होती याच क्षेत्रांमध्ये अजून आपण किती पुढे जाऊ शकतो? किंवा अजून वेगळं काही करता येऊ शकतं का? मग एडमिनचे काम करत होता असं विचारल्यावर तो म्हणाला तेच काम केलं तेच काम जमलं आणि मला असं वाटलं मी त्याच्यातच मला गती आहे कधी स्वतःला चेक केलं नव्हतं.
पुढे आपण त्याची व्यक्तिमत्व चाचणी करून घेतली, नोकरी सोडून पूर्णवेळ आता हेच काम सुरू आहे, जीएसटी मुळे अकाउंट क्षेत्रात प्रचंड काम मिळालं, आज हाताशी चार मुल आहेत उत्तमरीत्या काम सुरू आहे, नोकरीपेक्षा निश्चितच तिप्पट कमवत आहे, मात्र वेळ सुद्धा तिप्पट द्यावा लागत आहे. त्याचा Personality Type हा ISTJ असून त्यातील काही खास करियर किंवा जॉब खालीलप्रमाणे आहेत
• Accountant or Auditor.
• Budget Analyst.
• Claims Adjuster, Appraiser, Examiner, or Investigator.
• Compensation, Benefits, or Job Analysis Specialist.
• Cost Estimator.
• Financial Analyst.
• Financial Examiner.
• Financial Manager.
रवींद्र गमतीने म्हणतो आपण अधून-मधून जसं रक्ततपासणी करतो तसं आपले व्यक्तिमत्त्व तपासणी करून घेणे गरजेचे आहे,म्हणजे बरीचशी प्रश्न सुटतात

No comments:
Post a Comment