Wednesday, 9 May 2018

हा बाहेर का बोलत नाही....

|| श्रीपाद श्री वल्लभ || 
नमस्कार
आज एका विशिष्ट विषयावर आपण विचार करूया
एक फोन आला, "सर माझा मुलगा अजिबात बोलत नाही"
मी संपूर्ण विचारपूस करून ऑफिस मध्ये येण्यास सांगितले त्यावर त्या म्हणाल्या मी ऑफिस च्या बाहेर उभी आहे तुम्ही लवकर या ( हा फोन सकाळी साधारण ७ वाजता आला होता)
मी म्हटले अहो ऑफिस तर १० वाजता सुरु होते तुम्ही ठीक १० वाजता भेटा त्यावर त्या म्हणाल्या आता तुम्ही याच आपण चहा इथेच तुमच्या ऑफिस मध्ये घेऊया

मला तर जरा विचित्रच वाटले, मी  ७.३० ला पोहचलो, ऑफिस च्या बाहेर साधारणपणे ४० शी तील एक स्त्री उभी होती मग त्यांनी मला त्यांच्या मुलाची सारी माहिती दिली
त्या असेही म्हणाल्या तो चारचौघात खोकलत पण नाही किंवा शिंकत पण नाही
आणि घरी त्याला सांगावे लागते अरे गप्प बस म्हणून
काय असेल सर हे सारे? असे होऊ शकते का ?
आम्ही खूप उपचार केले त्याच्यावर, आता शारीरिक आणि मानसिक थकवा आला आहे त्याउपर पैसा पण खूप लागतो, आता तुमच्या कडे शेवटचा पर्याय म्हणून आले आहोत

"अमित" सध्या काय करतो
त्या म्हणाल्या मामाच्या गावाला गेलेला  आहे  आता जून मध्ये शाळा सुरु होईल आता तो आठवीत जाईल
"अमित" ला फक्त मामाचे घर व मामा आवडतो तो त्याच्याशी फार मोकळा बोलतो म्हणून त्याचा मामा इथे आलेला आहे मग कुठे आहेत ते ?
बाहेर गाडीत बसला आहे  तुम्ही गाडीने आलात का
हो " अमित" ला त्रास होऊ नये म्हणून मामाने गाडीच घेऊन टाकली आहे आज पावेतो संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे या गाडीने "अमित" साठी
"सर तुमची काय पण फी असेल ती मी भरायला तयार आहे, बाकी लेकराला परत पूर्ववत करा"
मी मामाला म्हटले या आत बसा

" सर तुम्ही जसे संजय ची केस सोडवली तशी आमच्या अमित साठी करा काहीतरी"
कस असते मामा आपण फक्त प्रयत्न करू शकतो, शाश्वती नाही देऊ शकत
" मग काय संजय राव " मी मुद्दामच चुकीच्या नावाने हाक मारून पाहिली
"अमित" ने फक्त नजर भिडविली आणि नजरेतून मला सांगितले " तो मी नव्हेच"
" अहो सर हे सगळ झाल आहे अदुगर, पण त्याचा काय पण उपयोग नाही बघा"

आमच्या कौन्सेलोर ने त्याला विचारले आता कितवीत आहे
तो काहीच बोलला नाही
मग त्याला विचारले तुला कुठले Ice cream आवडते
तो काहीच बोलला नाही
मग त्याला विचारले कोणता आवडता हिरो आहे
तो काहीच बोलला नाही

मग माझ्या पत्नीने विचारले असता वरील सगळ्या प्रश्नाची त्याने उत्तरे धडाधड दिली

" सर असेच तो घरी करतो त्याच्या पपांशी तो काहीच बोलत नाही मात्र मामांशी मस्त बोलतो" त्याला घरी सांगावे लागते कि गप्प बस आता इतका बडबड करतो तो अगदी सुसाट रेल्वे..... 
शाळेत कसे करतो ?
"सर शाळेत सुद्धा ठराविक शिक्षकांशी बोलतो" काय म्हणावे याला
आमच्या भगिरथ च्या एका टीम मेम्बर शी एकदम मन खुल्लास अमित बोलला
" मग माझ्याशी का नाही बोलला?"  असे आमच्या दुसऱ्या कौन्सेलोर ने विचारले   

 मी अगोदर त्याच्या मामाशी  बोललो , मग त्याच्या आई शी बोललो आणि त्यांना Selective Mutism या आजाराबद्दल सांगितले यालाच फोबिया असे म्हणतात एखाद्या विषयी वाटणारी अकारण भीती किंवा तिरस्कार. जशी त्याला आमच्या एका कौन्सेलोर बद्दल वाटली म्हणून तो एकदम शांत होता अबोल झाला आणि लगेच दुसऱ्या कौन्सेलर बरोबर अगदी मोकळा झाला 
  
काय आहे Selective Mutism
Selective Mutism is a complex childhood anxiety disorder characterized by a child's inability to speak and communicate effectively in select social settings, such as school. These children are able to speak and communicate in settings where they are comfortable, secure, and relaxed.
(source: https://selectivemutismcenter.org/whatisselectivemutism/)

अर्थात मुले फक्त तिथेच बोलतात किंवा संवाद साधतात जिथे त्यांना सुरक्षित व सुखदायक वाटते ९०% पेक्षा जास्त मुलांमध्ये सामाजिक भीती किंवा सामाजिक चिंता असते. यात प्रामुख्याने पौगंडावस्थेतील मुलामुलींना बोलण्याची भीती असते, जेथे बोलण्याची अपेक्षा असते तिथे हि मुले शांत राहतात, अगदी गप्प बसतात. बोलण्याच्या बाबतीत प्रतिसाद देणे किंवा संवाद सुरू करणे Selective Mutism च्या मुलांना अतिशय कठीण जाते ; म्हणून शक्यतो हि मुले सामाजिक समारंभ, कार्यक्रम, असे ठिकाण ते टाळतात.

का होतो Selective Mutism
हा विकार बहुतांश मुलांना अनुवांशिक (वंशपरंपरागत होतो) असतो. बर्याचदा ही मुले चिंताग्रस्त चिन्हे दाखवतात, जसे वेगळी चिंता, वारंवार अतिक्रमण आणि रडण,झोपण्याची समस्या आणि बाल्यावस्थेपासून अत्यंत लाजाळूपणा.   काही मुलांना संवेदी प्रक्रिया विकार अर्थात (Sensory Processing Disorder (DSI)) असतो विशिष्ट संवेदी माहितीवर प्रक्रिया करताना त्यांना समस्या येतात संवेदनेसंबंधी हे कमी पडतात. त्यांची ग्रहण क्षमता कमी असते
Selective Mutism चे निदान कसे करतात

 याचे बहुतेक वेळा चुकीचे निदान होते, तसेच खुपदा याचा पत्ताच किवा तपास लागतच नाही. साधारण पणे जीवनाच्या पहिल्या ५ वर्षात सामाजिक स्तरावर बोलायचे टाळणे, गप्प राहणे, व्यक्त ना होणे, हातवारे वापरणे, देह बोली चा जास्त वापर करणे. या आजारात शाळेतील सामाजिक विकासामुळे, खेळाच्या मैदानामुळे किंवा सामाजिक संमेलनांनी मुलांची चिंता वाढत जाते.
यावरील मुख्य उपायात:
(१) मित्रवर्ग, शेजारी आणि मित्रांशी मुलांशी संवाद साधणे, 
(२) overprotective attitudes कमी करणे       
(३) शांत, सुरक्षित, बोलका, प्रेमळ आणि समजण्याजोगा वातावरण देऊ

आपण यावर निश्चित मार्ग काढावा तो हि लवकरात लवकर कारण या disorder मुळे खालील गोष्टींचा अभाव दिसतो आणि तो त्यांच्या पुढील शैक्षणिक भावितव्यासाठी घातक ठरू शकतो

(१)वर्गामध्ये सहभागी न होणे,
(२)मदतीची आवश्यकता असते तेव्हा मदत मागू न शकणे,
(३)समवयीन लोकांशी संबंध प्रस्थापित करू न शकणे

भगिरथ कौन्सिलिंग सेंटर जळगाव येथे ५ सेटिंगमध्ये तसेच पालकांच्या, शिक्षकांच्या मित्रांच्या मदतीने "अमित" हा Selective Mutism च्या विळख्यातून सही सलामत बाहेर आला आज तो अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घेत आहे, आम्हाला खात्री आहे लवकरच तो त्यात अव्वल बाजी मारून आपले स्थान अबाधित ठेवेल 

मनाचिया द्वारी ......
पंकज व्यवहारे ७०५७२०२४९८  









       


  

    

No comments:

Post a Comment

मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...