मराठी टक्का हा प्रशासकीय सेवेत तसा कमीच हे वाक्य सारख मनाला रुतायचे म्हणून एका ध्येय वेड्या माणसाने IAS, IPS, IRS etc. प्रशासकीय सेवेतील सर्वोच्च पदासाठी इयत्ता १२ पासून पुढे तयारी करण्यासाठी जळगाव शहरात NILD (national institute of leadership development) हा कोर्स काढला त्याच्याच बाबतीत हा लेख (दीपस्तंभ कडून साभार )
१० वी १२ वी नंतर काय करावे?
UPSC, MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करुन स्पर्धा परिक्षा द्याव्यात याबात सध्या मोठ्या प्रमाणत जागरुकता होत आहे. स्पर्धा परिक्षांच्या माद्यमातून करिअर ठरवितांना खालील काळजी घ्यावी .
१) कायमचे सरकारी पद, प्रतिष्ठा, पैसा मिळावा म्हणून या क्षेत्राकडे वळु नये.
२) इतर अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतात म्हणून या क्षेत्राकडे वळू नये .
३) या परिक्षांचा अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिकांचे स्वरुप, पुस्तके या बाबींचे बारकाईने विश्लेषण करावे.
४) सर्वात महत्वाचे म्हणजे परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर सुमारे ३० वर्ष जे काम तुम्ही करणार आहात त्या कामाचे स्वरुप,व्याप्ती आवश्यक कौशल्ये ,आव्हाने इ. बाबींची आवर्जुन माहिती घ्यावी व शक्य असल्यास प्रत्यक्ष अनुभव घ्यावी.
५) स्पर्धा परिक्षा पास होण्यासाठी तसेच अधिकारी म्हणून काम करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मक विचार, सातत्यपूर्ण मेहनतीची तयारी, अपयश आल्यास त्यातून धडा घेवून पुन्हा तयारी करण्याचे धैर्य, सामाजिक जबाबदारी व समस्यांचे भान, प्रामाणिकपणा, संवेदनशीलता, नेतृत्व करण्याची वृत्ती या गुण कौशल्याची आवश्यकता असते. आपल्याकडे या बाबी मुलभूत पातळीवर आहेत का? त्या विकसीत करण्याची आपली तयारी आहे का याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
६) शक्यतो १२ वी नंतर लगेच योग्य मार्गदर्शनाने स्पर्धा परिक्षांची तयारी सुरु करावी. ही संधी चुकल्यास योग्य मार्गदर्शनाने पदवीच्या कुठल्याही वर्षात असाल तरी तात्काळ स्पर्धा परिक्षांचा अभ्यास सुरु करावा.
दीपस्तंभ फाऊंडेशन संचलीत नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ लिडरशीप डेव्हलपमेंट हा १२ वी नंतर ३ वर्षांचा अभ्यासक्रम स्पर्धा परिक्षांची तयारी करण्यासठी सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत पदवीची ३ वर्षे सुरु असतांना युपीएससी, एम.पी.एस.सी. स्पर्धा परिक्षांचा अभ्यास व सोबतच चांगला माणूस व चांगले नेतृत्व घडण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.
७) यु.पी.एस.सी., एम. पी. एस. सी. परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे निश्चीत केले असल्यास १२ वी नंतर ३ वर्षांचा पदवी अभ्यासक्रमानुसार प्रवेश घ्यावा. शक्यतो बी.ए. केल्यास, अभ्यासास अधिकवेळ मिळून कमी वयात उच्च अधिकारीपद मिळू शकते. या संदर्भातही तज्ज्ञांकडून कौन्सलिंग करुन द्यावे. कारण विद्यार्थ्याच्या मानसिकता व क्षमताप्रमाणे वेगवेगळे निर्णण मीवे लागतात.
८) दीपस्तंभ ही व्यावसायिक संस्था नसून, व्यक्तीनुसार योग्य करिअर निवडीस मदत करणारी स्वयंसेवी शिक्षण संस्था आहे. स्पर्धा परिक्षा हे सर्वांनीच करावे असे करिअर नाही. स्पर्धा परिक्षांकडे वळावे अथवा इतर करिअर निवडावे या संदर्भात प्रामाणिक मार्गदर्शन दीपस्तंभमध्ये प्रा. यजुर्वेंद्र महाजन व त्यांचे सहकारी मागील १२ वर्षापासून करीत आहेत.
No comments:
Post a Comment