सामर्थ्य या
शब्दास आणि अर्थ या जीवनास दे
आजच्या लेखनाचे दोन शब्द ‘सामर्थ्य’ आणि ‘अर्थ’ आपल्या अख्या
जीवनाचे सार आहे कारण कि गीतकार गुरुठाकुर यांच्या लेखणीतून आणि संगीतकार राहुल रानडे
यांच्या संगीतबद्ध झालेली सुंदर प्रार्थना ऐकतांना “सामर्थ्य या
शब्दास आणि अर्थ या जीवनास दे” याचा परिपूर्ण अर्थ समजून घेण्यासाठी आपण एकदा तरी दीपस्तंभ
फाउंडेशन च्या आत्मविश्वास व वाचन प्रेरणा अभियान या प्रकल्पाला भेट
दिली पाहिजे.
शब्दास सामर्थ्य देण्यास उत्तम वाचन पाहिजे यासाठी दीपस्तंभ
फाउंडेशन स्वयंसेवी संस्था 2005 सालापासून महाराष्ट्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विविध
उपक्रम व प्रकल्प राबविते. अपंग, अनाथ, आदिवासी, ग्रामीण
विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक सुविधा प्रशिक्षण या माध्यमातून दिले जातात. विशेषतः वाचन संस्कार रुजावा यासाठी
शालेय स्तरावर च्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी दीपस्तंभ आत्मविश्वास व वाचन
प्रेरणा अभियान हा अभिनव उपक्रम संस्थेमार्फत 2011 पासून राबविला जातो.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांमध्ये
वाचनाची गोडी लागावी, त्यांचा
सर्वांगीण विकास व्हावा, संस्कारक्षम
समाजाची निर्मिती व्हावी यासाठी हा प्रकल्प राबविला जातो
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची
पुस्तक खरेदी करण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपण त्यांना या प्रकल्पमार्फत
अत्यंत कमी शुल्कात पुस्तक
उपलब्ध करून देत असतो. या साऱ्या मेहनतीने जीवनास खरा
अर्थ प्राप्त होणार यात तिळमात्र शंका नाही
एका तळ्यात होते बदके पिले सुरेख.....
या गाण्यात एका पिलाला राजहंस म्हटले आहे. आपल्या प्रत्येकामधे एक “राजहंस” असतोच फक्त तो सुप्तावस्थेत असतो
त्याच्यातील उडण्याच्या
इच्छेला/इराद्याला पंख देण्याचे काम दीपस्तंभ करते.
ना नफा ना तोटा या तत्त्वावर हा
प्रकल्प संस्थेमार्फत राबविला जातो. काही संस्था व काही उद्योजकांची यासाठी मदत
घेतली जाते. अतिशय कमी शुल्कात अवांतर वाचनाचे पुस्तक यामध्ये उपलब्ध करून दिले
जातत. त्यावर आधारित परीक्षा घेतली जाते . व त्या परीक्षेतून जे विद्यार्थी उत्तम
गुण घेऊन पुढे येतील त्यांना
देशभरातल्या संस्था व व्यक्तींच्या भेटी घडविण्यासाठी सहलींचे आयोजन केले जाते.
अतिशय प्रामाणिक उद्देश ठेवून ही
चळवळ अतिशय प्रतिकूल परिस्थिती सध्या वाचनाबद्दल असतानाही दीपस्तंभ फाउंडेशने चालू ठेवलेली आहे. त्याच अनुषंगाने यावर्षी म्हणजेच सन 2019 साठी हा प्रकल्प राबविला जाणार असून यात आपण
सुद्धा काही आर्थिक किंवा काही पुस्तके भेट देऊन मदत करू शकतो.
फुल ना फुलाची पाकळी असे समजून आपणही या जगन्नाथाच्या
रथाला हातभार लावावा म्हणून आजचा
लेख प्रपंच आम्हाला आपली मदत अपेक्षित आहे असे
या प्रकल्पाचे प्रमुख श्री. वीरभूषण
यांचे आग्रहाचे सांगणे आहे जगात उत्सवप्रिय व उत्साही आणि असंख्य चालीरीतींना
हजारो वर्षांपासून नियमबद्ध व वचनबद्ध करीत या उत्सवाचा वारसा पुढील पिढीला
देण्याच्या प्रक्रियेला आपण संस्कृती म्हणतो त्यातीलच एक आहे वाचन संस्कृती अशा या
वाचन संस्कृतीची नाळ पक्की करण्यासाठी दीपस्तंभ
फाउंडेशन च्या आत्मविश्वास व वाचन प्रेरणा अभियान या प्रकल्पाला आपला
सलाम चला आपणहि म्हणूया
सामर्थ्य या
शब्दास आणि अर्थ या जीवनास दे
प्रा. पंकज
व्यवहारे
भगीरथ
काऊन्सिलिंग सेंटर जळगाव
७०५७२०२४९८