Saturday, 28 March 2020

प्रेरणा-आनंद-समृद्धी 28/03/2020 ENGLISH


प्रेरणा-आनंद-समृद्धी 28/03/2020
चला घेऊया प्रेरणा, होऊया आनंदी आणि करूया आपले विचार समृद्ध
थोडा बदल करूया आपल्या विचारात, काही तरी प्रेरणामय, आनंदी आणि आयुष्य समृद्ध करणारे ...... चला ओळख करून घेऊया काही उत्तम पुस्तकांची, आता भरपूर वेळ आहे त्यामुळे आपण किमान हि थोडी माहिती नक्कीच वाचू शकतो, भविष्यात शक्य झाल्यास पुस्तक खरेदी करावे
(मुद्दामच अश्या पुस्तकांची माहिती देणार आहे ज्यांचे pdf किंवा e-book सध्या तरी उपलब्ध नाही आणि तसेही खरच वाचनाचा आनंद हा पुस्तकातूनच मिळत असतो)
रोज दोन पुस्तकांची एक इंग्रजी आणि दुसरे मराठी पुस्तकांची मी माहिती देईन
आजचे इंग्रजी पुस्तक : ZEN Graden
लेखक: Subroto Bagchi
प्रकाशन: Penguin Random House India
फोर्ब्स इंडिया या magazine मधील झेन गार्डन चे लेख प्रकाशित लेख म्हणजेच हे पुस्तक होय, या पुस्तका मध्ये एकूण ५२ पाथमेकर्स चे अनुभव, विचार आणि त्यांचे साहस चीत्तारले आहे एकूणच या पुस्तकात १२ विभाग तयार केले आहेत व्हिजन, करेज, डीटरमीनेशन, इनोव्हेशन इत्यादी विभाग आहेत. याच पुस्तकात क्रिएटिव्ह इकोनोमी या शब्दा बद्दल अख्खा एक विभाग असून त्यातील प्रतिभावान व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार हे सुब्रतो बागची यांनी त्यांच्या सुलभ व समृद्ध लेखणीतून अक्षरबद्ध केले आहेत
Must Read Book for every Startup and new entreprenuer, Management students & teaching faculties.
प्रेरणा-आनंद-समृद्धी
आपले विचार कॉमेंट रुपात नक्की द्यावे
भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर, जळगाव
७०५७२०२४९८, ७३८५१०२४९८



प्रेरणा-आनंद-समृद्धी 28/03/2020 MARATHI


प्रेरणा-आनंद-समृद्धी 28/03/2020
चला घेऊया प्रेरणा, होऊया आनंदी आणि करूया आपले विचार समृद्ध
थोडा बदल करूया आपल्या विचारात, काही तरी प्रेरणामय, आनंदी आणि आयुष्य समृद्ध करणारे ...... चला ओळख करून घेऊया काही उत्तम पुस्तकांची, आता भरपूर वेळ आहे त्यामुळे आपण किमान हि थोडी माहिती नक्कीच वाचू शकतो, भविष्यात शक्य झाल्यास पुस्तक खरेदी करावे
(मुद्दामच अश्या पुस्तकांची माहिती देणार आहे ज्यांचे pdf किंवा e-book सध्या तरी उपलब्ध नाही आणि तसेही खरच वाचनाचा आनंद हा पुस्तकातूनच मिळत असतो)
रोज दोन पुस्तकांची एक इंग्रजी आणि दुसरे मराठी पुस्तकांची मी माहिती देईन
आजचे मराठी पुस्तक : निराळ जग, निराळी माणस
लेखक: डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशन: Lok wangmay Gruh
मुंबईच्या दैनिक प्रहार मधील प्रकाशित लेख म्हणजेच हे पुस्तक होय, या पुस्तकाचे दोन भाग आहेत पहिल्या भागात ८ लेख आहेत त्यात वेश्या, मनोरुग्ण, अंध, अपंग, परित्यक्त्या स्त्रिया, बालक व बालगुन्हेगारव तुरुंग यांच्या बाबतीत माहिती दिली असून त्याच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे कार्यवर्णन दिले आहे. त्यात मुंबईच्या प्रार्थनासमाजाने चालवलेल्या पंढरपुरच्या बालकाश्रमाचा समावेश आहे. या आश्रमाबद्दल श्री लवटे यांना खास ममत्व वाटते कारण यातच त्यांची जडणघडण झाली.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात या वर्गासाठी काम करणाऱ्या १७ सेवाव्रतींच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यामध्ये मातृमंदिरच्या इंदिराबाई हळबे, कुमुदताई रेगे, दादासाहेब ताटके इत्यादी.
श्री. सुनीलकुमार लवटे यांच्या समाजसेवेच्या दीर्घ अनुभवाचे फळ म्हणजे हे पुस्तक होय. त्यांनी ज्या संस्था पाहिल्या, अनुभवल्या त्यांचे यथार्थ चित्रण म्हणजे हे पुस्तक होय.
हे पुस्तक वाचून नक्कीच समाजाला आपली जबाबदारी समजेल, संवेदनशील सेवाव्रती समाजसेवक निर्माण होतील. Must Read Book for every BSW/MSW students, working in NGO, CSR
प्रेरणा-आनंद-समृद्धी
आपले विचार कॉमेंट रुपात नक्की द्यावे
भगीरथ काऊन्सिलिंग सेंटर, जळगाव
७०५७२०२४९८, ७३८५१०२४९८

Thursday, 26 March 2020

फ्री करियर कौन्सिलिंग

वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून एका पालकाच्या विनंतीमुळे उद्या पासून सकाळी १० ते १२ या वेळेत आपण आपल्या आवडीच्या करियर बद्दल किंवा भविष्यातील करियर संबंधी प्रश्न विचारू शकतात ७०५७२०२४९८ या नंबरवर उद्या विषय आहे Statistics आणि Mathematics

मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...