Tuesday, 18 December 2018

सजदा तेरा सजदा ....... दिन रैन करू ...."मनोबल"

Sajda….tera sajda (I’ll worship you) Din rain karoon (Day and night) 
Na hi chain karoon (I’ll never rest)

सजदा तेरा सजदा, दिन रैन करू, ना ही चैन करू सजदा तेरा सजदा

आज म्हणजे ०२ दिसम्बर २०१८ तब्बल ८ वर्षांपूवी आलेल्या माय नेंम इज खान मधील सजदा तेरा सजदा, या गाण्याचा खरा खुरा अर्थ समजण्यास सुरुवात झाली ती म्हणजे यजुर्वेंद्र यांच्या ध्येयाने वेड्या झालेल्या आणि सतत कार्यमग्न असणारया मनोबल या प्रकल्पामुळे. मनोबल च्या स्थापनेआधी १२ वी उत्तीर्ण व १८ वर्षावरील अनाथ विद्यार्थांसाठी संजिवन च्या माध्यमातून मुला- मुलींसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य केंद्र उभारले, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजनेत गरीब, दुष्काळग्रस्त, विद्यार्थांसाठी गुरुकुल च्या माध्यमातून मुला-मुलींसाठी नि:शुल्क निवासी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारले. संजिवन व गुरुकुल या प्रकल्पात तब्बल १०० विद्यार्थी व विद्यार्थिनी लाभ घेत आहेत.  
      
मी माझे माथे झुकवणार तुझी पूजा करणार, रात्र आणि दिवस नतमस्तक होणार, कधीही ना थकता, अविश्रांत मी तुझ्या आराधनेत डुंबून राहणार, याच तत्वावर यजुर्वेंद्र व टीम मनोबल, गुरुकुल व संजिवन सतत कार्यरत आहे. येत्या २७ मार्च २०१९ ला दीपस्तंभला तब्बल १४ पूर्ण होणार आहेत या संपूर्ण प्रवासात आजपावेतो १००० पेक्षा जास्त मुलांचे सुवर्ण भवितव्य बनवण्यात, आकार देण्यात आणि आयुष्य घडवण्यात दीपस्तंभ कायम दिमाखात उभा होता आणी आज हि उभा आहे. याच कार्यात सतत खोलवर चिंतन करीत असतांना आणि महाराष्ट्रभर होत असणाऱ्या व्याख्यानमाला मधून यजुर्वेंद्र सरांना एक मोठा प्रश्न समोर आला त्याने तो अस्वस्थ झाला, झोप उडाली, भूक लागेना, कश्यातच मन लागेना......

काय घडलेलं होत हे फक्त यजुर्वेंद्र ला माहित होत... ज्ञात होत.. पण व्यक्त होता येत नव्हत... कुठली तरी घुसमट होत होती... सर आम्ही नाही का हो आमचे प्रशासकीय सेवेतील करियर करू शकत? या एका दिव्यांग मुलाने विचारलेल्या प्रश्नाने  आणि मग एका आगळ्या वेगळया जगा निराळ्या भारतातील एकमेव अश्या भव्य भावनेने उत्कट, प्रखर विचाराने भरलेला त्या विद्यार्थांना उभारी देणारा, मनाला बल प्राप्त करून देणारा तुमचा आमचा मनोबल तयार झाला.  त्या अश्या विद्यार्थांनी सुद्धा करियर करावे आणि यातच उत्तर सापडले ते एका व्याख्यानमालेत विचारलेल्या प्रश्नाचे..... सारी अस्वथता संपली..... आता यजुर्वेंद्र आपल्या २०० दिव्यांग मुलांसोबत पोटभर जेवतो, प्रत्येक सण उत्साहात साजरे करतो, होळी पासून दिवाळी पर्यंत सार काही एकाच छताखाली अर्थात मनोबलमध्ये; मात्र आजही दिन रैन करू, ना ही चैन करू सजदा तेरा सजदा याचा ध्यास लागलेला आहेच.

प्रकाश-पुजन नावाचा एक आगळा वेगळा सण फक्त मनोबल मध्ये साजरा होतो, प्रत्येक अंध मुला-मुलींचे पूजन अर्थात प्रकाश-पूजन! काय क्रांतिकारी व अफलातून विचार आहे, यावर तो म्हणतो त्यांचे बाह्य जगातील डोळे नसतील पण आतील चक्षु जागृत आहेत ते खरे भगवान बुद्धा च्या म्हणण्या नुसार अत्त दीप भवची अनुभूती घेत असतात. ते स्वत: दिपक आहेत त्यामुळे दीपावलीच्या शुभ पर्वावर यांची पूजा करणे मला गरजेचे वाटते. 

एका तळ्यात होते बदके पिले सुरेख..... या गाण्यात एका पिलाला राजहंस म्हटले आहे. मनोबल मध्ये येणारा प्रत्येक मुलगा/ मुलगी आपणहून एक राजहंस आहेत. यांच्यातील उडण्याच्या इच्छेला/इराद्याला बल देण्याचे काम दीपस्तंभ चे मनोबलकरते. जगातील जितके हि उत्तुंग कार्य आहेत त्याला जरा जास्तच वेळे लागलेला आहे कारण ते एका दोघांचे स्वप्न नसून अखील विश्वाचे कल्याणकारी, समृद्धी आणणारे आहे. अर्थात या वैश्विक प्रकल्पाला हातभार सुद्धा लाखोंचे लागले आहेत, आज मनोबलस्थापन होऊन ४ वर्षे झाली आहेत साधारण ४२ दिव्यांग त्यांच्या यशस्वी आयुष्यात दिमाखाने, अभिमानाने जगत आहेत.... अजून बरच काम बाकी आहे.
  
आस्ते कदम, आस्ते कदम हा यजुर्वेंद्र चा अत्यंत आवडता कार्य मंत्र तसेच लगे रहो और एक ही लक्ष पर डटे रहो हे सुद्धा तो नेहमी सांगत असतो. श्रद्धेय स्वामी विवेकानंद, श्रद्धेय कर्मवीर भाऊराव पाटील व श्रद्धेय बाबा आमटे यांच्या विचारसरणीवर यजुर्वेंद्र उभा आहे आणि आपण माणूस म्हणून जगलो पाहिजे असे तो त्याच्या प्रत्येक व्याख्यानात आवर्जून सांगतो.मला नाही माहित माझ्या विद्यार्थ्याला त्याची पोस्ट मिळेल का पण तो एक सुसंकृत माणूस बनेल याकडे माझे कायम लक्ष असते आणि असेल 
        
तब्बल १४ इमारती मध्ये हा सगळा पसारा आहे, फार कठीण आहे याला एका कवेत घ्यायला पण त्याच्या एका हाकेला सगळा स्टाफ, २०० मुले सुवास्य वदनाने तयार असतात. या साऱ्याला कारण फक्त एकच प्रामाणिकतेचे अनुष्ठानअसे यजुर्वेंद्र न विसरता सांगतात. साधारण ६०,००० रुपये एका वर्षाला एका विद्यार्थ्याला निवास-भोजन-प्रशिक्षण यासाठी लागतात. त्याशिवाय इतर प्रशासकीय खर्च असा महाकाय तब्बल २ कोटी रुपये वार्षिक खर्च येतो. 

लवकरच स्वत:च्या भव्य अश्या मनोबलच्या प्रकल्पासाठी ६ कोटी रुपये लागणार आहेत यात वडील या नात्याने आणि उदार अंत:कर्णाने मोठी अशी जागा कुसुंबा येथे मा. आदरणीय श्रद्धेय, श्री. रतनलाल बाफनाजी यांनी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी रात्रंदिवस एकच ध्यास घेऊन काम प्रगती पथावर आहे ज्यात भारतातून कोणताही दिव्यांग "मनोबल" येऊन आपल्या स्वप्नांची पूर्तता करू शकतो 

आज मनोबल पुणे येथे ५८ विद्यार्थी खास UPSC साठी तयारी करत आहेत चला आपण हि एक दिवस, एक क्षण अनुभवू या.. आपण दिलेल्या देणगीवर, आशीर्वादावर आणि मदतीवर कदाचित आपणही यजुर्वेंद्र च्या सजदा तेरा सजदा...दिन रैन करू, ना ही चैन करू....  चा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष भाग होऊ शकतो.....

 © भगीरथ काउन्सीलिंग सेंटर, जळगाव
पंकज व्यवहारे ७०५७२०२४९८     


Monday, 5 November 2018

ऑटीझम काळजी आणि थोडक्यात उपचार पद्धती (संपादित संकलन)

मिरर न्यूरॉन्स- मुलांचा विकास- ऑटीझम भाग २
ऑटीझम काळजी आणि थोडक्यात उपचार पद्धती (संपादित संकलन) 

 ऑटीझम उपचार: (2  एप्रिल जागतिक  ऑटिझम दिवस)
मेंदूच्या कार्यक्षमतेत मोठय़ा प्रमाणावर विकलांगता आणणा-या ऑटिझममुळे मुले अतिचंचल आणि आक्रमक होतात, ऑटिझमग्रस्त मूल असणे एखाद्या कुटुंबाच्या मानसिक, सामाजिक आणि आर्थिक बाबींवर परिणाम करते. असा आजार असणाऱ्या मुलांची क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न करावे लागतात. शिक्षक, पालक, डॉक्टर, सायकोथेरपिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ इत्यादींनी एकत्र काम केले तर असा आजार असणाऱ्या मुलांमध्ये काही अंशी सुधारणा होऊ शकते. तथापि, हा आजार पूर्णपणे बरा होईल याची खात्री देता येत नाही. मात्र, उपचारानंतर त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा सुधारणा नक्कीच होते
ऑटिस्टिक मुलांना सांभाळताना या 6 गोष्टी लक्षात ठेवा
(1)मुलाला प्रेम व आधार द्या
(2)प्रश्न विचारत रहा
(3)इतरांबरोबर अधिक मिसळू द्या
(4)प्रोसेस्ड फूड टाळा 
(5)इलेक्ट्रॉनिक वस्तू दुर ठेवा 
(6)संभाषण वाढवा  

·        बिहविअर प्रोग्राम्स अर्थात वर्तन प्रणाली
या उपचार पद्धतीत मुलांनी दैनंदिन कसे वागावे, त्यांच्या शारीरिक हालचालीपासून त्यांच्या, बोलण्यापर्यंत सार काही त्यांना शिकवावे लागते. उदा. नजर भिडविणे, इतर लोकांमध्ये मिसळणे, सूचना पाळणे, नियम अंगवळणी होणे, हाताने जेवण करणे, काट्या चमच्याने खाणे, विविध टेबल संस्कार (Table Manners),कपडे घालणे, अभ्यास करवून घेणे, त्रागा, चिडचिड की करण्यास शिकविणे इत्यादी.                   
·        औषधोपचार: रीतसर मानसोपचार तज्ञाकडून औषधोपचार घेणे. ऑटीझमसाठी औषध देता येत नाही. त्यातील विशिष्ट लक्षणांसाठी काही प्रमाणात औषध दिले जाते. 
·        प्रशिक्षण व त्यांच्या कलेने शिकविणे: वैयक्तिक कौशल्ये, सूक्ष्मकारक कौशल्ये, संगीत उपचार पद्धती, सामाजिक, सांस्कृतिक, व नात्यातील कौशल्य.       
·        इतर थेरपीज (उदा. स्पीच थेरपी): विशेष शिक्षण, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स थेरपी तसेच ड्रामा थेरपीनुसार मुलांना शिकवले जाते. 
 रेफरन्स: (अजून अभ्यासासाठी खालील लिंक पाहावे या लींक वरून वरील लेख तयार केला आहे) 



---: भगीरथ कौन्सलिंग सेंटर,
जळगाव
वृषाली व्यवहारे 
९४२०३८४८३४  

Monday, 29 October 2018

मिरर न्यूरॉन्स- मुलांचा विकास- ऑटीझम


अरे अमोल माझ्याकडे असलेल्या संग्रही एका जुन्या मटा च्या लेखात (१५ मे २०१५) डॉ. सुनील गोडबोले  यांचा एक लेख आला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे कि, " मुलांच्या विकासात या मिरर न्यूरॉन्सचा महत्त्वाचा वाटा आहे. इतरांची नक्कल करणे, समोरच्या सोबत संवाद साधणे, भाषेचा विकास, भावना व्यक्त करणे, इतकेच काय तर समोरच्यांचा मनात काय चालले आहे, हेही याच मेंदूतील आरशांमुळे शक्य होते. संशोधकांना यातून भाषाविकासातील अडथळे, स्वमग्नता यावर उत्तरे मिळतील."

तसेच आपण आपल्या पाल्याच्या प्रगतीमध्ये कशी मदत करतो यामध्ये सुद्धा मिरर न्यूरॉन्स. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे मेंदूतील आरसे स्वच्छ आणि चकाचक पुसून ठेवण्याची जबाबदारी आपल्या मोठ्यांची आहे. पण त्यासाठी आपल्याही मेंदूतील आरसे स्वच्छ हवेत. ते पूर्वग्रहदूषित, द्वेष, मत्सर, अहंकाराने डागाळले तर संवाद संपलाच. यातून मग मुलांसोबत, कुटुंबीयांसोबत वाद, भावनिक धूसफूस सुरू होते. 

अरे कमाल आहे सर, म्हणजे आपल्या सारख दुसऱ्याला हि वाटते त्यांच्या भावना, विचार कल्पना आणि प्रेरणा आपल्यासारखेच आहेत असे आपण गृहीत धरतो, किंवा आपण जो दुसरयाबद्दल अंदाज लावत असतो आणि निष्कर्ष काढतो तोच मुळी मिरर न्यूरॉन्स मुळे क्या बात है सर .....
पण जर असे होते नसेल तर त्याला काही आजार वगैरे असतो का? का तो जरा वेगळा असू शकतो का? सर तुमच्या भाषेत सांगायचे तर Introvert स्वत:मध्ये रमणारा बरोबर ना?  

नाही रे अमोल असे नसते, इतके सोपे नसते माणसाला ओळखणे पण या साधारणपणे दिसणाऱ्या शारीरिक हालचाली आहेत ज्याबाबतीत पालकांनी, शिक्षकांनी, मित्रांनी थोडा आग्रह धरला आणि थोडी काळजी घेतल्यास संभाव्य धोके टळू शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येते.

संभाव्य धोके? आणि कशाची तीव्रता? म्हणजे काय सर, यात कुठला आला आहे धोका
चल तुला आज एका मानसिक आजाराबद्दल काय संभाव्य धोके, त्याचा इतिहास, जमेची बाजू व त्यांची मुख्य लक्षणे त्यावर घ्यावयाची काळजी आणि उपचार पद्धती, आपण बोलतोय ऑटीझम बद्दल.

ऑटोस या ग्रीक शब्दापासून ऑटीझम शब्द तयार झाला, ऑटोस म्हणजे स्वत: असा त्याचा अर्थ होतो थोडक्यात म्हणजे स्वत:मध्ये गुंतणे, आत्ममग्न किंवा स्वमग्न राहणे, यांचा बाह्यजगाशी काहीही संबध नसतो, कमी किंवा नगण्य सामाजिक क्षमता असतात, यांची भाषेची वाढ खुंटते, संवाद साधता येत नाही, समाजात मिसळत नाही.

साधारणपणे १९०८ साली Eugen Bleuler या Swiss psychiatrist ने ऑटीझम हा शब्द जगाला बहाल केला. ऑटीझम असलेल्या मुलांचे ४ प्रकारात वर्गीकरण करता येते (यातच मुख्यत्वे मिरर न्यूरॉन्स चा सुगावा लागतो)

1) Sterio type
2) compulsive
3) ritualistic
4) restricted

यात Sterio type म्हणजे निरुपयोगी हालचाल, compulsive म्हणजे सक्तीचे वागणे व त्या प्रकारे हालचाल करणे, ritualistic म्हणजे विधीवादी,तेच तेच नियमित करणारा आणि शेवटचा restricted म्हणजे सीमित आणि प्रतिबद्ध हालचाली करणारा.

त्यांची मुख्य लक्षणे:
हे एक टक पहात बसतात, आपले हाताची बोटे परत परत वळवतात, डोके आपटतात, मित्रांमध्ये मिक्स होत नाही, एकाच प्रकारचे कपडे आवडतात, एकाच प्रकारचे खाणे आवडते, eye contact नसणे, विचारलेला प्रश्न परत परत बोलून मग त्याचे उत्तर देणे इ. त्यांचे बाह्य स्वरूप दिसते यात मिरर न्यूरॉन्स चा अभाव दिसतो.

यांच्या बौद्धिक क्षमता विकसित नसतात, सामजिक देवाण-घेवाण कमी असल्यामुळे मित्र नसतात, ते आपल्याच विश्वात रममाण होतात. एकाग्रतेचा अभाव असतो.

जमेची बाजू:
पण हे जरी असले तरी ते कुठल्यातरी एका क्षेत्रात अव्वल असतात उदा. अव्वल धावपटू, उत्तम चित्रकार, उत्तम कारागीर, मोठाली गणिती सोडवू शकतात.

आज एव्हढेच ठीक आहे 
पुढे आपण यांची काळजी आणि उपचार पद्धती यावर बोलूया बर का अमोल ... 
ओके सर, पुढच्या आठवड्यात जरा जास्त वेळ काढून येतो...      
                     
         


      
      
   

    

Sunday, 28 October 2018

अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome : P4C आपल्या शाळेत अथवा कोचिंग क्लास मध्ये

अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome : P4C आपल्या शाळेत अथवा कोचिंग क्लास मध्ये

P4C च्या प्रत्येक सेशन मध्ये आम्ही सारे मिळून खूप काही शिकत आहोत, जवळपास अनेक मराठी, सेमी आणि इंग्रजी (स्टेट बोर्ड शाळेमध्ये) अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome संबधी चर्चा ऐकण्यास मिळाली. एक सुंदर पत्रिका हातात देत श्री विंचूरकर सर (तात्यासाहेब सामंत महाविद्यालय, चाळीसगाव येथील मुख्याध्यापक) म्हणाले व्यवहारे सर, अध्ययन निष्पत्ती चे माहिती पत्रक हे इयत्ता ६वी, ७वी आणि ८वी साठीचे तुमच्याकडे असू दया. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई या त्रयीने फार चांगला विचार करून प्रत्येक विषयानुसार अध्ययनार्थीला या विषयाचा अभ्यास केल्यावर काय मिळेल यालाच Learning Outcome म्हणतात. आपण का शिकत आहोत, मला विद्यार्थी म्हणून काय मिळेल, मी अजून काय व कसे श्रम घेतल्यास माझे Learning Outcome अर्थात अध्ययन निष्पत्ती साधणे सोपे जाईल.   

नीट काळजीपूर्वक अभ्यास केल्यावर आपणाला P4C च्या प्रत्येक सेशन मध्ये अध्ययन निष्पत्ती अर्थात Learning Outcome साधण्यासाठी जवळपास ९०% मदत होते, शिवाय आमच्या P4C चे एक ४५ मिनिटांचे सेशन हे अध्ययनार्थीला, शिक्षकाला आणि पालकांना प्रत्येक विषयाचे Learning Outcome अर्थात अध्ययन निष्पत्ती साधणे अत्यंत सोपे व परिणामकारक जाईल.
आम्ही P4C च्या माध्यमातून इयत्ता ५वी ते इयत्ता १२ वी च्या अध्ययनार्थी च्या ३० विविधांगी क्षमता निर्माण करू शकतो, त्यांचा बहुपयोगी वापर शिकवितो जेणेकरून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या अध्ययन निष्पत्तीच्या अपेक्षापूर्ती कडे विद्यार्थ्याची वाटचाल होऊ शकते.

प्रत्येक शाळेला फक्त दर आठवड्यातील एक तास (२० मुलाचा एक ग्रुप) असे २४ आठवडे, आता आपल्याकडे उरले आहेत फक्त(नोव्हेंबर चे शेवटचे २ + डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत १२)१४ आठवडे ज्यात आपण ५०% ते ६५% अध्ययन निष्पत्ती साधू शकतो. येत्या शैक्षणिक वर्षापासून आपल्याकडे असतात तब्बल २४ आठवडे, तेव्हा आपण ९०% पर्यंत अध्ययन निष्पत्ती साधतो आणि २० बौद्धिक क्षमता व १० सामाजिक क्षमता विकसित करू शकतो.

P4C आपल्या शाळेत अथवा कोचिंग क्लास मध्ये सुरु करायचे असल्यास डेमो लेक्चर साठी संपर्क साधावा

पंकज व्यवहारे ७०५७२०२४९८ 
आदित्य धर्माधिकारी:९४२०३९०४४५   
सौ. वृषाली व्यवहारे: ७३८५१०२४९८     

भगीरथ कौन्सिलिंग सेंटर, जळगाव              
            


Saturday, 27 October 2018

P4C ची दमदार सुरुवात

P4C ची दमदार सुरुवात
P4C अर्थात Philosophy for Children,College & Community
टीम भगीरथ ने मागील एका महिन्यात जळगाव पासून थेट ४० गावपर्यंत शाळा, महाविद्यालय व प्रोफेशनल institute मधून अनेक P4C चे कार्यक्रम अत्यंत प्रभावी व परिणामकारक असे घेत आहेत
P4C मध्ये काय होते?
*P4C ने आपण २० बौद्धिक व १० सामाजिक क्षमता विकसित करू शकतो
*P4C ने आपला IQ हा ६%ने चक्क वाढतो
*P4C ने आपण आपल्या EQ अर्थात भावनिक बुध्यांक वर उत्तम काम करू शकतो
P4C चे सेशन कसे होते ?
P4C चे प्रत्येक सेशन हे १ तासाचे असून प्रत्येक आठवड्यात १ तास असे २० आठवडे असते
P4C च्या प्रत्येक सेेशन मध्ये कमीत कमी १५ तर जास्तीत जास्त २० मेम्बर असतात
P4C च्या प्रत्येक सेशन मध्ये आठवड्यासाठी काही विचार दिला जातो
प्रत्येक नवीन सेशन च्या वेळी मागच्या आठवड्यासाठी चा विचार अभ्यासला जातो
P4C कुणासाठी आहे?
P4C(Philosophy for Children) शालेय मुलांसाठी इयत्ता ५वी ते १२ वी
P4C (Philosophy for collegecollege) महाविद्यालयीन मुलांसाठी
P4C(Philosophy for Community) पालक,शिक्षक,कर्मचारी, समाज इ.
P4C च्या डेमो कार्यक्रमासाठी संपर्क करा:
भगीरथ कौन्सिलिंग सेंटर,
दुसरा मजला,  ३ लीलावती कोम्प्लेक्स
डॉ. गिरीश सहस्रबुद्धे यांच्या दवाखान्यासमोर
जळगाव
पंकज व्यवहारे : ७०५७२०२४९८
वृषाली व्यवहारे: ७३८५१०२४९८










Thursday, 18 October 2018



२०११ ते २०१८ सात वर्षांचा भगीरथ कौन्सिलिंग सेंटर चा प्रवास
आज संध्याकाळी अर्थात २०११ ला एक कौन्सिलिंग सेंटर सुरु करण्याचा चा विचार आला, २००१ मध्ये आमचे सर सुधीर पुराणिक (pali ballaleswar) यांच्या संस्थेचे नाव भगिरथ होते तेच नाव आम्ही पण घ्यायचे ठरले होते फक्त ते ट्रेनिंग संदर्भात होते, एवढाच काय तो बदल.
आज आमचे भगीरथ कौन्सिलिंग सेंटर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, भगीरथ कौन्सिलिंग सेंटर वयैक्तिक समुपदेशन पासून सांघिक समुपदेशन पर्यंत तसेच कार्यक्षेत्रा बद्दल बोलायचे तर शालेय, महाविद्यालयीन हे आधी पासून होतेच २०१८ पासून औद्योगिक क्षेत्र सुद्धा सुरु केले. विविध मानास्शात्रीय चाचण्या, त्यात प्रामुख्याने IQ, EQ, Aptitude Test, करियर कौन्सलिंग, वर्तन समस्या, Personality Test, Study Test etc.
सुरुवात सौ. वृषाली व्यवहारे(मानसशास्त्रिय समुपदेशक) यांनी २०११ मध्ये केली आज तब्बल ४ कौन्सेलोर भगीरथ च्या टीम मध्ये आहेत, सोबत तज्ञ डॉ. मयुर मुठे (MD psychiatry) आणि त्यासोबत शिक्षण तज्ञ भरत दादा अमळकर व यजुर्वेंद्र महाजन सर आणि अजून समाजातील जवळपास प्रत्येक क्षेत्रातील अव्वल असे ६ मार्गदर्शक आज आमच्या पाठीशी आहेत
२०१५ ला मी स्वत: विविध कार्यशाळा, ट्रेनिंग अंतर्गत भगीरथ कौन्सिलिंग सेंटर मध्ये शिरकाव केला, यात REBT & NLP च्या कार्यशाळा या वयक्तिक, कार्यालयीन, कौटुंबिक इ. ठिकाणी या टूल चा कसा वापर करावा याचे मागदर्शन सुरु केले Industrial counseling साठी कामगार कल्याण चे श्री मिलिंद जी पाटील यांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन मिळते
पुढे २०१७ ला आदित्य धर्माधिकारी, हा आमचा करसल्लागार व अभिनव आइडीया देणारा म्हणून भगीरथ ला जॉईन झाला,
ऑगस्ट २०१७ ला योगेश्वर जोशी हा हरहुन्नर असा MSW कौन्सेलोर आमच्या बरोबर भगीरथ कौन्सिलिंग सेंटर च्या पुढील प्रवासासाठी सोबत आला. आज आदित्य व योगेश्वर हे दोघे MA Psychology करीत आहेत,
आजमितीला आम्ही
२ शाळा, २ कम्पनी, २ महाविद्यालय, ३ कोचिंग क्लास यांच्याशी वार्षिक करार अंतर्गत तब्बल ८००० विद्यार्थी, २००० पालकांपर्यंत आम्ही पोहचलो आहोत, ९८ बुकोपेडीआ, शेकडो करियर कौन्सलिंग चे प्रोग्राम, ५ ABEL चे प्रोग्राम. अजून बराच पल्ला गाठायचाय.....
आमच्या संपूर्ण टीमने नुकतेच P4C [Philosophy for Children] चे CTK तर्फे अर्थात चलो थिंक करे चे [Certified Facilitator] सर्टीफिकेशन केले आहे
अजून दोन समुपदेशक लवकरच भगीरथ कौन्सिलिंग सेंटर च्या परिवारात येत आहेत,
आपण सादर आमंत्रित आहात आमच्या ऑफिस मध्ये
भगीरथ कौन्सिलिंग सेंटर,
लीलावती कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, प्रताप नगर
डॉ. गिरीश सहस्रबुद्धे यांच्या दवाखान्यासमोर, जळगाव
सकाळी ११ ते ५ (सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवार)
बुधवार सुट्टी
रविवार : सकाळी १० ते दुपारी १ व दुपारी ३ ते रात्री ८
या दसऱ्याच्या निमित्ताने आता आम्ही लवकरच सीमोल्लंघन करण्याचे ठरविले आहे.....
संचालिका
भगीरथ कौन्सिलिंग सेंटर, जळगाव
वृषाली व्यवहारे : ७३८५१०२४९८

Tuesday, 16 October 2018

वाचन प्रेरणा दिनानिमित्त IMR येथें मी पुस्तकांबद्दल बोलतांना, धन्यवाद या अत्यंत स्तुत्य उपक्रमाबद्दल व माझ्यात सुद्धा वाचन संस्कार रुजवण्यासाठी प्राचार्या डॉ.शिल्पा बेंडाळे ग्रंथपाल डॉ.चंद्रशेखर वाणी आणि दीपक घुगे आणि माझा मित्र व MBA विभाग प्रमुख प्रा.विशाल संदनशीवे

मिड करियर crisis

मिड करियर crisis अर्थात ३५ शी नंतर करियर किंवा व्यवसाय करायचा का या संबंधीत काही उदाहरणे रवींद्र हा एका फर्ममध्ये एडमिन चे काम बघत होता, ...