अरे अमोल माझ्याकडे असलेल्या संग्रही एका जुन्या मटा च्या लेखात (१५ मे २०१५) डॉ. सुनील गोडबोले यांचा एक लेख आला आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे कि, "
मुलांच्या विकासात या ‘मिरर न्यूरॉन्स’चा महत्त्वाचा वाटा आहे. इतरांची नक्कल करणे, समोरच्या सोबत संवाद साधणे, भाषेचा विकास, भावना व्यक्त करणे, इतकेच काय तर समोरच्यांचा मनात काय चालले आहे, हेही याच मेंदूतील आरशांमुळे शक्य होते.
संशोधकांना यातून भाषाविकासातील अडथळे, स्वमग्नता यावर उत्तरे मिळतील."
तसेच “आपण आपल्या पाल्याच्या प्रगतीमध्ये कशी मदत
करतो यामध्ये सुद्धा मिरर न्यूरॉन्स. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे मेंदूतील
आरसे स्वच्छ आणि चकाचक पुसून ठेवण्याची जबाबदारी आपल्या मोठ्यांची आहे. पण
त्यासाठी आपल्याही मेंदूतील आरसे स्वच्छ हवेत. ते पूर्वग्रहदूषित, द्वेष, मत्सर, अहंकाराने
डागाळले तर संवाद संपलाच. यातून मग मुलांसोबत, कुटुंबीयांसोबत वाद, भावनिक धूसफूस सुरू होते.”
अरे कमाल आहे सर, म्हणजे आपल्या सारख दुसऱ्याला हि वाटते
त्यांच्या भावना, विचार कल्पना
आणि प्रेरणा आपल्यासारखेच आहेत असे आपण गृहीत धरतो, किंवा आपण जो दुसरयाबद्दल अंदाज लावत असतो
आणि निष्कर्ष काढतो तोच मुळी मिरर
न्यूरॉन्स मुळे क्या बात है सर .....
पण जर असे होते नसेल तर त्याला काही आजार
वगैरे असतो का? का तो जरा वेगळा
असू शकतो का? सर तुमच्या भाषेत
सांगायचे तर Introvert स्वत:मध्ये रमणारा बरोबर ना?
नाही रे अमोल असे नसते,
इतके सोपे नसते माणसाला ओळखणे पण या साधारणपणे दिसणाऱ्या शारीरिक हालचाली आहेत
ज्याबाबतीत पालकांनी, शिक्षकांनी, मित्रांनी थोडा आग्रह धरला आणि थोडी काळजी
घेतल्यास संभाव्य धोके टळू शकतात किंवा त्यांची तीव्रता कमी करता येते.
संभाव्य धोके? आणि
कशाची तीव्रता? म्हणजे काय सर, यात कुठला आला आहे धोका
चल तुला आज एका मानसिक
आजाराबद्दल काय संभाव्य धोके, त्याचा इतिहास, जमेची बाजू व त्यांची मुख्य लक्षणे त्यावर
घ्यावयाची काळजी आणि उपचार पद्धती, आपण बोलतोय ऑटीझम बद्दल.
ऑटोस या ग्रीक
शब्दापासून ऑटीझम शब्द तयार झाला, ऑटोस म्हणजे स्वत: असा त्याचा अर्थ होतो
थोडक्यात म्हणजे स्वत:मध्ये गुंतणे, आत्ममग्न किंवा स्वमग्न राहणे, यांचा बाह्यजगाशी
काहीही संबध नसतो, कमी किंवा नगण्य सामाजिक क्षमता असतात, यांची भाषेची वाढ खुंटते,
संवाद साधता येत नाही, समाजात मिसळत नाही.
साधारणपणे १९०८ साली Eugen
Bleuler या Swiss psychiatrist ने ऑटीझम हा शब्द जगाला
बहाल केला. ऑटीझम असलेल्या मुलांचे ४ प्रकारात वर्गीकरण करता येते (यातच मुख्यत्वे
मिरर न्यूरॉन्स चा सुगावा लागतो)
1) Sterio type
2) compulsive
3) ritualistic
4) restricted
यात Sterio type म्हणजे निरुपयोगी हालचाल, compulsive म्हणजे सक्तीचे वागणे व त्या प्रकारे
हालचाल करणे, ritualistic म्हणजे विधीवादी,तेच तेच नियमित करणारा आणि शेवटचा restricted म्हणजे सीमित आणि प्रतिबद्ध हालचाली
करणारा.
त्यांची मुख्य लक्षणे:
हे एक टक पहात बसतात, आपले हाताची बोटे
परत परत वळवतात, डोके आपटतात, मित्रांमध्ये मिक्स होत नाही, एकाच प्रकारचे कपडे
आवडतात, एकाच प्रकारचे खाणे आवडते, eye contact नसणे, विचारलेला प्रश्न परत परत बोलून मग
त्याचे उत्तर देणे इ. त्यांचे बाह्य स्वरूप दिसते यात मिरर न्यूरॉन्स चा अभाव दिसतो.
यांच्या बौद्धिक क्षमता
विकसित नसतात, सामजिक देवाण-घेवाण कमी असल्यामुळे मित्र नसतात, ते आपल्याच विश्वात
रममाण होतात. एकाग्रतेचा अभाव असतो.
जमेची बाजू:
पण हे जरी असले तरी ते
कुठल्यातरी एका क्षेत्रात अव्वल असतात उदा. अव्वल धावपटू, उत्तम चित्रकार, उत्तम कारागीर,
मोठाली गणिती सोडवू शकतात.
आज एव्हढेच ठीक आहे
पुढे आपण यांची काळजी आणि उपचार पद्धती यावर बोलूया बर का अमोल ...
ओके सर, पुढच्या आठवड्यात जरा जास्त वेळ काढून येतो...